दिव्यांगाच्या योग्य पुनर्वसनासाठी सर्वंकष सर्वेक्षण करा-पालकमंत्र्यांचे निर्देश
अकोला, दि. 6 (जिमाका) –जिल्ह्यातील दिव्यांगाचे सक्षम व योग्य पुर्नवसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या करीता दिव्यांगांची इत्तंभुत माहिती संकलन करण्यासाठी सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले. या माहितीचा वापर करुन अद्यावत संगणक प्रणाली तयार करुन सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देता येईल, असेही ना. कडु यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात आज पालकमंत्री
ना. कडु यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले
यावेळी विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरीया, विधान सभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी.
श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील दिव्यांग
व्यक्तिंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्याचा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन
आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मत ना. कडु यांनी व्यक्त
केले. दिव्यांगत्वाचा प्रकाराचे निदान करणे, त्यावर
योग्य ते वैद्यकीय उपचार करुन दिव्यांगत्व कमी वा नाहिसे करुन त्या दिव्यांग व्यक्तिस सक्षम बनवणे,
तसेच त्यांचे कौशल्य व कल पाहुन आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी
पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ना. कडु यांनी केले.
या पद्धतीने काम करुन
दिव्यांगाच्या सुयोग्य पुनर्वसनाचा आदर्श राज्यात निर्माण करावा, असेही ना. कडु यांनी सांगितले.
यावेळी उत्तम संगणक
प्रणाली (सॉप्टवेअर) तयार करणे,
त्यासाठी दिव्यांगांची इत्तंभुत माहिती जसे, वय,
लिंग, राहण्याचे ठिकाण, दिव्यांगाचा
प्रकार, त्याला लागणारे उपचार, दिव्यांग
व्यक्तिची सामाजिक-आर्थिक स्थिती इत्यादी चे संकलन
करण्यासाठी सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश ना.
कडु यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
अनाथ बालके व
थॅलेंसेंमिया रुग्णांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ
जिल्ह्यातील थॅलेसेमिया
या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तिंना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सामाजिक
आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पालकमंत्री ना. बच्चु कडु यांच्या
निर्देशानुसार मंजुर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयात 24
थॅलेंसेंमिया रुग्णांना दरमहा
एक हजार रुपये अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले.
तसेच, अनाथ व्यक्तिंनाही हा लाभ मंजुर करण्यात आला असून जिल्ह्यात 240 अनाथ लाभार्थ्यांना
दरमहा एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले. अशी
माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा