74 अहवाल प्राप्त; 17 पॉझिटीव्ह, 17 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.19(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 74 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 57 अहवाल निगेटीव्ह तर 17 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत आहे.   

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जण व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8075(6533+1377+165) झाली आहे. आज दिवसभरात 17 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 41661 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  40590 फेरतपासणीचे 212 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 859 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41416 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34883 तर पॉझिटीव्ह अहवाल  8075(6533+1377+165) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 17 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 17 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  रणपिसे नगर येथील सहा जण, तर उर्वरीत सिंधी कॅम्प, एसपी ऑफिस जवळ, गोकुळ कॉलनी व मोठी उमरी  येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिव्हील लाईन, कौलखेड, गुसर, शास्त्री नगर, अकोट, डाबकी रोड व जीएमसी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये दोन जणांचा व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

17 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जणांना, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल स्काय लार्क येथील तीन जण, सुर्याचंद्रा हॉस्पिटल येथून एक जण, अकोला अॅक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर अवघते हॉस्पीटल येथून दोन जणांना अशा एकूण 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात गोकुळ कॉलनी, जवाहर नगर  येथील 72 वर्षीय महिला असून ती दि. 17 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

455 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  8075(6533+1377+165) आहे. त्यातील 266 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7354 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 455 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ