सातबारा संगणीकरणाचे व प्रलंबीत फेरफार संबंधीचे आढावा बैठक

 


  

     अकोला,दि.16 (जिमाका)- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूमव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची सातबारा संगणीकरण व प्रलंबीत फेर फार संबंधी तसेच इतर  विषायावर आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपनिवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विजय लोखंडे व सहाय्यक जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोलकर तसेच झूमव्दारे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

सातबारा संगणीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आलेले असून राहिलेले काम त्वरीत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच फेर फार संबंधीचा डाटा अपलोड करावा. पिएम किसान योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांचे यादी पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहे. त्या अडचणी दुर करुण ते काम येत्या 20 तारखेपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

माझी कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कोमार्बिट रुग्णांची यादी तयार करुन त्यांच्या तपासणीचे काम पूर्ण करावे. सोमवार पासून प्रत्येक तालुक्यात किमान 50 व्यक्तीची कोविड19 ची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिली. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आधार प्रमाणिकरण राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण्याचे काम पूर्ण करण्यासाठी येत्या बुधवारी (दि.21) रोजी विशेष शिबीर आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ