जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अकोला,दि. 27(जिमाका)-  ग्रामीण भागात युवा कल्याण, सामाजिक व ग्रामीण विकासांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थासाठी  युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा अकोला जिल्हातील युवा मंडळाना जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनातर्फे राबविल्या जात आहे. पुरस्काराकरीता युवा मंडळाची निवड करताना त्यांनी केवळ एप्रिल 2019 ते मार्च 2020 कालावधीत केलेल्या कार्याचा विचार करण्यात येईल. जिल्हास्तरावर निवड झालेली संस्था राज्यस्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल व राज्यस्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीयस्तरावर निवडीसाठी पात्र राहील. जिल्हास्तरीय पुरस्कार रु. 25 हजार व प्रमाणपत्र, राज्यस्तरीय विजेता संस्थेस रु. 75 हजार व  प्रमाणपत्र तर राष्ट्रीयस्तरीय विजेता संस्थेस प्रथम विजेता रु. तीन लक्ष, व्दितीय एक लक्ष, तृतीय  50 हजार रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. मंडळांच्या पदाधिकारी यांचे वय 31 मार्च 2020 ला 29 च्या आत असावे, मागील  दोन वर्षात मंडळाने उपरोक्त पुरस्कार प्राप्त केलेला नसावा. तसेच मंडळ नेहरू युवा केंद्राशी संलग्न असणे व सण 2019-2020 चा ऑडिट रिपोट असणे बंधनकारक राहील.

 पुरस्काराकरीत आवेदन करणाऱ्या युवा मंडळांनी नमुना अर्ज नेहरू युवा केंद्र वसंत देसाई स्टेडियम, दुसरा माळा, अकोला कार्यालयातून 4 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष प्राप्त करावा पूर्ण भरलेले आवेदनपत्र संस्था आणि नोंदणी पत्र घटना, वार्षिक अहवाल, फोटो, बातमी व अंकेक्षण रिपोर्ट अन्य आवश्यक कागद पत्रासह 10 नोव्हेंबरचे आत सादर करून या सुवर्ण संधीचा फायदा अकोला जिह्यातील युवक मंडळांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन युवा समन्वयक महेश सिंह शेखावत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ