पालकमंत्र्यांची जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट व पाहणी
अकोला, दि.6(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल आदी उपस्थित होते.
यावेळी, ना. कडु यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कोविड कक्षातील सुविधांची पाहणी केली. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णालयातील सेवा, सुविधांबाबत आढावा घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा