165 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 93 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.30 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 165 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 135 अहवाल निगेटीव्ह तर 30 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8384(6761+1446+177) झाली आहे. आज दिवसभरात 93 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 43003  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41873 फेरतपासणीचे 226 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 904 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42893 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36132 तर पॉझिटीव्ह अहवाल 8384(6761+1446+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 30 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 30      जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  सातव चौक येथील चार जण, मूर्तिजापूर, रजपुतपुरा व राजंदा येथील प्रत्येकी तीन जण, गणेश नगर, रामदास पेठ, रेणुका नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील दोन जण,तर उर्वरित तारफैल,  जीएमसी, देवरावबाबा चाळ, जाठरपेठ, महाजन प्लॉट, जवाहर नगर, भागवत वाडी जुने शहर, व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण महिला असून ती अकोट येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 10  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

93 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जणांना,  हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण, अकोला अॅक्सीडेंड क्लिनिक येथून तीन जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर येथून एक जण तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 80 जणांना, अशा एकूण 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण माधव नगर, ता. तेल्हारा येथील 78 वर्षीय पुरुष असून तो दि. 25 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

241 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8384(6761+1446+177) आहे. त्यातील 279 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7864 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 241 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ