रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 106 चाचण्या, एक पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 17(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 106 चाचण्या झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही.  बाळापूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  बार्शिटाकळी येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 51 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 37 चाचण्या झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 106 चाचण्यांमध्ये एक जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 19932 चाचण्या झाल्या त्यात 1420 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ