रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 194 चाचण्या, 13 पॉझिटिव्ह
अकोला,दि. 6
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 194
चाचण्या झाल्या त्यात तेरा जणांचा
अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-
अकोला ग्रामिण, तेल्हारा व पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 18 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह
आला. बार्शीटाकळी येथे
9 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात
एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे पाच जणांची चाचणी
झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला
मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 66 चाचण्या झाल्या त्यात तिघाचे अहवाल
पॉझिटिव्ह आलेत.
67 वैद्यकीय
कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 28 चाचण्या झाल्या त्यात , सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असे
दिवसभरात 194 चाचण्यांमध्ये 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर
आजपर्यंत 18295 चाचण्या झाल्या त्यात 1313 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने
कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा