रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 216 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 16 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 216 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, बालापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही.  अकोट येथे 17 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 62 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 64 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 62 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे  चाचण्या झाल्या नाही, तर हेडगेवार लॅब येथे 11 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 216 चाचण्यांमध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 19826 चाचण्या झाल्या त्यात 1419 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ