राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

 


अकोला,दि. 8 (जिमाका)-शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2003-04 या शैक्षणीक सत्रापासून इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबतची योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता 10 वी व 12 च्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये रोख पारितोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.

जिल्ह्यातील इयत्ता 10 वी 12 वीचा निकाल घोषीत झालेला आहे. या योजनेचा प्रस्ताव शाळा महाविद्यालयाकडून समाज कल्याण कार्यालयात सादर करण्यात यावे. तसेच सर्व संबंधित शाळामहाविद्यालय प्रमुख यांना कळविण्यात येते की, परिपुर्ण प्रस्ताव उदा. शाळामहाविद्यालयामधून 10 वी 12 वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम अनुसूचित जाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावा सोबत विद्यार्थ्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची सांक्षाकित प्रत,  विद्यार्थांचा शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स व विद्यार्थ्यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स प्रत, शाळा किवा महाविद्यालयाच्या शिफारशीसह सादर करण्याकरिता कळविण्यात येत आहे. सदर प्रस्ताव दिनांक 21 ऑक्टोंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला या कार्यालयात सादर करावे. जेणे करुन सदरील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. कालमर्यादेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास विद्यार्थी सदर योजने पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शाळामहाविद्यालय प्रमुखांची राहिल यांची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ