रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 112 चाचण्या, सात पॉझिटिव्ह


अकोला,दि. 2 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 112 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण,अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. मुर्तिजापूर येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 51 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले58 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, असे दिवसभरात 112 चाचण्यांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17737 चाचण्या झाल्या त्यात 1274 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना