119 अहवाल प्राप्त; 19 पॉझिटीव्ह, 93 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.29 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 119 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 100 अहवाल निगेटीव्ह तर 19 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दोघांचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8344(6731+1436+177) झाली आहे. आज दिवसभरात 93 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42830  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41710 फेरतपासणीचे 223 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 897 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42728 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35997 तर पॉझिटीव्ह अहवाल 8344(6731+1436+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 19 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 19 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  जठारपेठ येथील पाच, तर उर्वरित बाळापूर, राधाकिसन प्लॉट, एमव्ही हॉस्टेल, तेल्हारा, मंगरुळ कांबे, राजंदा, महाजनी प्लॉट, मुर्तिजापूर, पातूर, खडकी व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील दोन जण तर बाळापूर नाका येथील एक या  प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

93 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 10 जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन जण, तर ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 80 जणांना, अशा एकूण 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात राजंदा, बार्शीटाकळी येथील 68 वर्षीय महिला असून ती दि. 27 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर मोठी उमरी येथील 75 वर्षीय महिला  असून ती दि. 23 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

295 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8344(6731+1436+177) आहे. त्यातील 278 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7771 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 295 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ