रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 184 चाचण्या, 13 पॉझिटिव्ह
अकोला,दि. 12 (जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 184 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व पातूर येथे चाचण्या झाल्या
नाही. अकोट येथे 36 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सात
चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे सहा चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे
दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 52 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, 55 वैद्यकीय
कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 15 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब् येथे आठ चाचण्या झाल्या
त्यात दोन जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 184 चाचण्यांमध्ये
13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 19124 चाचण्या झाल्या त्यात 1380 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा