जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पिक कापणी प्रयोग

 




अकोला,दि. 21(जिमाका)- अकोला तालुक्यातील आलीयाबाद येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत सोयाबिन पिक कापणी प्रयोगाचे  प्रात्यक्षिक संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषि अधिकारी दिनकर प्रधान, मंडळ कृषि अधिकारी प्रकाश राऊत, रामकृष्ण फुलारी, पर्यवेक्षक गजानन महल्ले, तलाठी धनश्री पाटकर, कृषि सहाय्यक रविद्र माळी यांची उपस्थिती होती.

            आलीयाबाद येथील गुरुदत्त शंकर पागृत यांच्या शेतातील 10 बाय 5 मीटरचा सोयाबिन पिकाचा प्लॉट घेऊन तेथील पिकाची कापणी सर्वांसमोर करण्यात आली. यावेळी सोयाबिण  पीक मळणी पुर्वी 17.41 किलो ग्रॅम भरले. मळणी नंतर सोयाबिणचा उतारा 2.710 किलोग्रॅम इतका आला. यावरुन अंदाजे हेक्टरी साडेपाच ते सहा ‍क्विंटल सरासरी पीक होणार असल्याचा अंदाज काढण्यात आला.  यावर्षी अती पावसामुळे सोयाबिण पिकावर खोड अळी आली. तसेच पावसामुळे पीकातील दाने कमी प्रमाणात भरले त्यामुळे उतारा कमी आला असा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाने सांगीतले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ