महाबीजच्या सौरउर्जाचलित वातानुकुलित व आर्द्रताविरहीत गोदामाचे लोकार्पण

 

अकोला,दि. 21(जिमाका)-महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाव्दारे शिवणी येथे उभारण्यात आलेल्या सौरउर्जा चलित वातानुकुलीत व आर्द्रताविरहीत गोदाम प्रकल्पाचे उद्घाटन तथा लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मा.ना. अॅड.संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे यांचे हस्ते मंगळवार .20आक्टोंबर  रोजी पार पडले.

 

सदर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्याचे पालकमंत्री मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तसेच मा.ना.डॉ.श्री.विश्वजित पतंगराव कदम, कृषि राज्यमंत्री यांची उपस्थिती लाभली. तसेच विशेष उपस्थितीत महाबीजचे अध्यक्ष तथा सचिव (कृषि) श्री.एकनाथ डवले, व्यवस्थापकीय संचालक श्री.अनिल भंडारी तथा महाबीजचे संचालक श्री.वल्लभराव देशमुख उपस्थित होते.

 

सदर प्रकल्प हा सौरउर्जेवर आधारीत असून देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादक महामंडळापैकी प्रथमच अशा प्रकारचा प्रकल्प बनविण्यात आलेला आहे हे विशेष. सदर प्रकल्पामध्ये बियाण्यांच्या दर्जानूसार साठवणूक करण्याकरीता आर्द्रता व तापमानानूसार सहा स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे अतिशय महत्वाचे मुलभूत, पायाभूत, भाजीपाला, तसेच प्रमाणित बियाणे साठवणूक केल्यावर बियाण्याची उगवणशक्ती व जोम अधिक कालावधीकरिता टिकून ठेवणे शक्य होईल. सदर गोदाम कार्यान्वित झाल्यामुळे मौल्यवान बियाण्याची वातावरणामुळे होणारी हानी रोखून गुणवत्ता राखता येईल व पुढील हंगामासाठी सदर बियाणे उपयोगात आणता येईल.

श्री.अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज यांनी सदर प्रकल्पास राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे अर्थसहाय्य तसेच महाबीजच्या स्वनिधीमधून तयार झाले असल्याचे कळविले आहे. सदर प्रकल्पाची सुविधा जागा शिल्लक असल्यास महाबीजची गरज पूर्ण झाल्यानंतर उपलब्धतेनूसार इतर शासकीय उपक्रम व शेतकरी उत्पादक कंपनी यांना सुध्दा उपलब्ध करून देता येवू शकेल.

 

उद्घाटन सोहळ्यामध्ये कृषि मंत्री मा.ना.दादाजी भुसे यांनी सदर प्रकल्पामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक बियाण्याची साठवणूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकल्पामध्ये सौरउर्जेचा सुध्दा वापर होत असल्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल.

 

मा.ना.अॅड.श्री.संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री यांनी हा उच्च दर्जाचा प्रकल्प महाबीजने उभारल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. महाबीजचा हा प्रकल्प महामंडळासाठी गौरवास्पद असून इतर राज्यातील सार्वजनिक क्षेत्रामधील बियाणे महामडंळाकरीता सुध्दा पथदर्शी व  आदर्श असल्याचे नमूद केले आहे.

 

सदर कार्यक्रमाकरीता महाबीजचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तथा आभार प्रदर्शन .प्रशांत पागृत, महाव्यवस्थापक (प्र.व अ.) यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ