विज पडून सहा जण जखमी

 


अकोला,दि. 12 (जिमाका)- रविवार (दि.11) रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून या वादळी पावसासह जिल्ह्यातील खांदला व दोनद खु. या गावात विज पडून सहा जण जखमी झाले आहे. त्यात मुर्तिजापूर येथील खांदला गावातील 43 वर्षीय विजय पिंपळे व 23 वर्षीय सुनील मोहीते विज पडून जखमी झाले आहे. तर बार्शिटाकळी तालुक्यातील  दोनद खु. येथील 45 वर्षीय श्रीमती संध्या दडस, 21 वर्षीय सिमा सदाशिव दडस, 19 वर्षीय सपना दडस व 20 वर्षीय प्रविण दडस यांच्यावर विज पडून जखमी झाले आहे. जखमी व्यक्तीवर अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार  सुरु आहे. तसेच मुर्तिजापूर तालुक्यातील मौजे कव्हळा येथील श्रीकृष्ण आगळे यांच्या मालकीची एक म्हैस विज पडून मृत झाली  असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ