131 अहवाल प्राप्त; 17 पॉझिटीव्ह, 29 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.18(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 131 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 114 अहवाल निगेटीव्ह तर 17 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत आहे.   

त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8055(6516+1375+164) झाली आहे. आज दिवसभरात 29 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 41578 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  40513 फेरतपासणीचे 212 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 853 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41342 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34826 तर पॉझिटीव्ह अहवाल  8055(6516+1375+164) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 17 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 17 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील समर्थ नगर व सांगळूद  येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, कुटसा ता. अकोट, अनिकेत पोलिस लाईन, भीम नगर, बाळापूर, आनंद नगर, आंबेकर नगर व अशोक नगर येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी, बोरगांव मंजू, कौलखेड व रिधोरा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये  एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

29  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  13 जणांना, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक जण, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून पाच जण,  ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, स्कायलार्क हॉस्पिटल येथून चार जण, बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून एक जण, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून दोन  जण तर हॉटेल रीजेन्सी येथून एक जणांना, अशा एकूण 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात देशमुख फाईल, रामदास पेठ येथील 68 वर्षीय पुरुष असून तो दि.4 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

453 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  8055(6516+1375+164) आहे. त्यातील 265 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7337 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 453 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ