रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 116 चाचण्या, सहा पॉझिटिव्ह
अकोला,दि. 21(जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 116 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही.
अकोट येथे 13 चाचण्या झाल्या त्यात दोन
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे चार चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, बार्शिटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह
आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या
झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 19 चाचण्या
झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 58 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे
13 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे
तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 116 चाचण्यांमध्ये
सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 20496 चाचण्या झाल्या त्यात 1441 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा