पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे 27 ते 31 दरम्‍यान ऑनलाईन आयोजन

 


            अकोला,दि. 26(जिमाका)- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (मुलांची) यांचे संयुक्‍त विद्यमाने ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा दि. 27 ते 31 ऑक्‍टोंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेला आहे.

            सदर मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील.  दहावी, बारावी, आय.टी.आय., पदवीकापदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना  ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल. कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या  www.mahaswayam.gov.in  या संकेतस्‍थळावर नांव नोंदणी केलेल्‍या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीकापदवी पुरुष तसेच  महिला  उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी,  उद्योजकएच.आर. प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवतील.

            या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात  जास्‍तीत जास्‍त  उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन नाव नोंदणी करुन सहभाग घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रां. यो. बारस्‍कर यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ