रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 166 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह


अकोला,दि. 26(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 166 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण,  पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 17 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे तीन  चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  तसेच अकोला मनपा  येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 46 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 64 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  वैद्यकीय महाविद्यालय येथे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 166 चाचण्यांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21062 चाचण्या झाल्या त्यात 1468 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना