मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


        अकोला,दि.1 (जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑक्टोंबरपर्यंत सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत टप्पाटप्याने सुरु करण्याबाबतचा कालावधी 31 ऑक्टोंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याबाबतचा  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

Containment Zone करीता मार्गदर्शक सूचना :

 

i.        ज्या ठिकाणी कोविड-१९ या साथीच्या रोगाचा मोठया प्रमाणात उद्रेक झाला आहे असे क्षेत्र किंवा असे क्लस्टर (Containment Zone ) या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आयुक्त/सक्षम प्राधिकारी यांनी सिमांकन करुंन प्रवेशास प्रतिबंध करण्यात यावा.

ii.      अशा  Containment ZoneBuffer Zone मध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार संचारबंदी कालावधी मध्ये अत्याश्यक व मुलभूत सेवा यांना देण्यात आलेली सूट लागू राहणार नाही. तसेच इतर परवानगी देण्यात आलेल्या बाबी सुध्दा प्रतिबंधीत राहतील.

iii.    अशा Containment ZoneBuffer Zone मध्ये कडक नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच अशा परिसरामध्ये आपत्कालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय सेवा, कायदा व सुव्यस्थेची निगडित सेवा) वगळंता इतर कोणतीही व्यक्ती यांना   Containment Zone मध्ये आंत किंवा बाहेर तपासणी केल्याशिवाय सोडू नये.

iv.    आदेशामध्ये दिलेल्या दिशानिर्देशाव्यतिरिक्त  Containment ZoneBuffer Zone करीता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

संपूर्ण अकोला जिल्‍हयामध्‍ये पुढील बाबी प्रतिबंधीत राहतील.

१)      सर्व प्रकारची शाळां, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे दि. ३१ ऑक्‍टोंबर २०२० पर्यंत  बंद राहतील.तथापी ऑनलाईन/ आंतर शिक्षण यांस मुभा राहील.

२)      सर्व प्रकारची सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे ( मॉल आणि मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स सह ) , प्रेक्षकगृहे, सभागृहेव इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.

३)      आंतरराष्‍ट्रीय हवाई वाहतुक सेवा बंद राहील.तथापी  गृह मंत्रालय यांनी परवानगी प्रदान केलेल्‍या वाहतुक  सेवा सुरु राहतील.

४)      मेट्रो रेल्‍वे बंद राहील.

५)      सर्व प्रकारची सामाजिक/राजकीय/खेळ/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील.

 

१.      यापूर्वीच्‍या आदेशान्‍वये अत्‍यावश्‍यक दुकांनाना परवानगी दिलेले  सर्व उपक्रम पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्‍यात येत आहेत. 

२.      या कार्यालयाचे आदेशान्‍वये वेळोवेळी परवानगी व अनुमती दिलेली कामे सुरू ठेवली जातील आणि पूर्वीचे सर्व आदेश या आदेशासह सकाळी ०९.०० ते रात्री ९.०० या वेळेत 31 ऑक्टोबर 2020  पर्यंत सुरु राहतील.

३.      संपूर्ण अकोला जिल्‍हयामध्‍ये पुढील बाबीं सुरु राहतील  

i.        हॉटेल/ भोजनालय/रेस्‍टॉरेन्‍ट व बार (मद्यगृहे)  दिनांक ५ ऑक्‍टोबर २०२० पासून  एकूण  बैठक व्‍यवस्‍थेच्‍या ५०%  क्षमतेसह.  या करिता स्‍वतंत्र मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्‍यात येईल.

४.      ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या विविध पुरवठादार तसेच उत्‍पादक यांना  कोणत्याही वेळी  राज्‍यात आणि राज्‍याबाहेर  वाहनांद्वारे  वाहतूक करण्‍यास बंधने राहणार नाही. या करिता  सहाय्य  आयुक्‍त,  अन्‍न व औषधे  प्रशासन यांनी  ऑक्सिजन घेऊन जाणा-या वाहनांची  आवश्‍यक ती  तपासणी  व  खात्री  करावी.

५.      या कार्यालयाचे विविध आदेशान्‍वये  निर्बंधामध्‍ये देण्‍यात आलेली  सुलभता व टप्‍पानिहाय लॉकडाऊन उघडण्‍याबाबतचे आदेश  कायम ठेवण्‍यात येत आहेत.   

६.      कोविड-१९ चे संदर्भाने  इतर आवश्‍यक सूचना

 

A.     सर्व प्रकारच्या सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य राहील. अन्यथा याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी.

B.     सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी,वाहतूकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing ) च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी ६ फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदार यांनी दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे  आढळून  न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी.

C.     सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम, मेळांवे, सभा आयोजित करुं नये.

i.                    लग्‍न समारंभाकरिता ५० व्‍यक्‍ती मर्यादीत राहतील ( संगीत कार्यक्रम, घोडा गाडी,बॅंड पथक,कॅटरिंग इत्‍यादी व्‍यक्‍तीसह )

ii.                  अत्‍यंविधी करिता २० व्‍यक्‍ती मर्यादीत राहतील.

iii.                सार्वजनिक स्‍थळी (रस्ते, बाजार, रुग्‍णालय, कार्यालये इ. ) ठिकाणी थुंकत असल्याचे आढळूंन आल्यास संबंधीत विभागाने कारवाई करावी.

iv.                या कालावधीत जास्तीत जास्त लोकांना घरुन  काम करण्याची (Work from Home ) मुभा राहील .त्याकरीता कार्यालय, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणीज्यिक आस्थापना यांनी त्यांचे कामाच्या वेळां त्या प्रमाणे निश्चित कराव्या.

v.                  सर्व प्रकारच्या कार्यालये/दुकाने/आस्थापना येथील कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनींग, हॅन्ड वॉश, व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी.

vi.                सर्व कामाच्या ठिकाणी काम करतांना सोशल डिस्टंसींगचे नियमांचे पालन करण्यात यावे. कामगार/कर्मचारी यांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, कामाच्या वेळां बदलतांना दोन शिप्‍फ्ट मध्ये अंतर ठेवण, दुपारच्या जेवणाच्या वेळामध्‍ये अंतर ठेवण्यात यावे.

७.      या रात्रीची संचारबंदी -संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती, नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत  रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वा पर्यंत सक्त मनाई करण्यात येत आहे.

 

 

८.      आरोग्य सेतू वापराबाबत.

१.      कोरोना प्रार्दुभाव रोखण्याकरीता आरोग्य सेतु अ‍ॅप हे संभाव्य धोका तात्काळओळखण्याचे कार्य करीत असल्याने व्यक्तीगत व समुह संरक्षण करण्याकरीता आरोग्य सेतू अ‍ॅप हे अत्यंत उपयुक्त असल्‍यामुळेसर्व शासकीय कार्यालयामध्ये कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्याकरीता सर्व कर्मचारी यांनी सुसंगत असलेल्या त्यांचे मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना देण्यात याव्या.

२.      सर्व प्रकारचे शासकीय कार्यालयातील ग्रुप  A  व ग्रुप  B  चे अधिकारी  यांची १००% उपस्थिती राहील.

३.      सर्व प्रकारचे खाजगी कार्यालये त्यांचेकडे असलेल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी  ३०% अथवा कमीत कमी ३० यापैकी  जी जास्‍त असेल अशा कर्मचा-यांचा  कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता आवश्‍यक उपाययोजना करुन वापर करु  शकतील.

४.      सर्वशासकीय कार्यालये त्यांचेकडे असलेल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी  ५०% अथवा कमीत कमी ५० यापैकी  जी जास्‍त असेल अशा कर्मचा-यांचा  कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता आवश्‍यक उपाययोजना करुन वापर करु  शकतील.

५.      केंद्रीय शासकीय कार्यालये ही त्यांना पूर्वी सूचित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुरु राहतील.

६.      कोविड-१९ साथ उद्रेक कालावधीमध्‍ये नारगीकांच्‍या सार्वजनिक हिताचे दृष्‍टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या  नारगीकांनी चेह-यावर मास्‍क, रुमाल किंवा इतर साधानांचा वापर करणे  बंधनकारक राहील.

७.      सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्‍या कार्यालयामार्फत No Mask No Entry याचा अवलंब करावा.

९.      बँकींग सेवा

अकोला  शहर व ग्रामीण जिल्हयातील कार्यरत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँक, खाजगी बँक, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था हया त्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत सुरु  राहतील. 

 

            उक्त संचारबंदीमध्ये अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा  भंग करणा-याकोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम  १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास यापूर्वी  निर्गमित केलेल्‍या आदेशास  पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आलेले आहे. सदर चे आदेश सुध्दा दि. ३१/१०/२०२० पर्यंत कायम ठेवण्यात येत आहे.

 

सदरचे संचारबंदीचे आदेश हे ३१ ऑक्टोंबरचे मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन