170 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 43 डिस्चार्ज
अकोला,दि.20(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 170 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 138 अहवाल निगेटीव्ह तर
32 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल
(दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जण व डॉ.
हेडगेवार हॉस्पिटल येथे पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 8122(6565+1387+170) झाली
आहे. आज दिवसभरात 43 रुग्ण बरे झाले, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 41859 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक
तपासणीचे 40785 फेरतपासणीचे 212 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 862 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 41586 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 35021 तर पॉझिटीव्ह अहवाल 8122(6565+1387+170) आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 32 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी
31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 21 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सात जण, सिंधी
कॅम्प येथील चार जण, सिटी कोतवाली व सांगळूद येथील प्रत्येकी
तीन जण, तर उर्वरित
सिरसोली, हिंगणा रोड, नेहरु नगर अकोट
फैल, हनुमान बस्ती, बाळापूर, दगडखेड ता. बाळापूर, वसंतनगर कौलखेड, गवळीपुरा, कैलास टेकडी, न्यु
राधाकिशन प्लॉट, मांजरी ता. बाळापूर, वाडेगाव,
गौरक्षण रोड व रेणूका नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष असून तो राजंदा ता. बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 10 जणांचा व
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर
या खाजगी प्रयोगशाळेतून आज पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला
होता. कृपया नोंद घ्यावी.
43 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून 23 जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून
सहा जण, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून पाच जण, कोविड केअर सेंटर येथून तीन जण, आयकॉन
हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल स्कायलार्क येथील तीन जण, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक जणांना
अशा एकूण 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
459 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा