105 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज, एक मयत

 

अकोला,दि.25 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 105 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 85 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत झाला.

 त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8265(6669+1419+177) झाली आहे. आज दिवसभरात 13 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42391  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41292 फेरतपासणीचे 219 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 880 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42296 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35627 तर पॉझिटीव्ह अहवाल 8265(6669+1419+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 20 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व 14 पुरुषाचा समावेश आहे. त्यातील सुंदर नगर  येथील तीन जण,  रामदास पेठ व जीएमसी  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित राऊतवाडी, सी. ओ. कॉलनी, मुकुंद नगर, राजांदा, गोरक्षण रोड,  वरखेड बार्शीटाकळी, आर. एस.  हॉस्टेल रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, न्यू महसूल कॉलनी, आदर्श नगर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

13 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12 जणांना व  हॉटेल स्कायलार्क येथून एक जणांना, अशा एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एक जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण भेंडी महाल, बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय पुरुष असून तो     दि. 22 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

507 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8265(6669+1419+177) आहे. त्यातील 271 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7487 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 507 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ