प्रतिबंधीत प्लास्टिक पिशवी विक्री प्रकरणी प्रतिष्ठानांवर कारवाई





अकोला,दि. 11(जिमाका)- प्रतिबंधीत प्लास्टिक 50 मायक्रोन पेक्षा कमी व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती तयार करण्याऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक पिशवीचा वापर तथा विक्री साठवणूक प्रकरणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या.  जवाहर नगर परीसरातील दुकानात  प्रतिबंधीत 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेले प्लास्टिक पिशवी विक्री व साठवूक करण्याऱ्या व्यापारावर कारवाई करुन त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड अंदाजे दहा हजाराचा माल जप्त करण्यात आला.  ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा व तहसीलदार सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाधिकारी कार्यालयातील नितीन निंबाळकर, गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहने बुंदेले, सदस्य सतिश अस्वार, तेजस मुळे, ऋषीकेश आढाव, शुभम झुंज, यश तिचिले यांनी पार पाडली.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ