ग्रा.पं.पोटनिवडणूक: मागास प्रवर्गातील रिक्त पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


अकोला दि.23(जिमाका) राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा,अनर्हता किंवा इतर अन्न कारणांमुळे रिक्त झालेल्या व निवडणूक आयोगाचे दि. 21 जून 2022 रोजीच्या  पत्रानुसार तेल्हारा तालुक्यातील भोकर, बाळापूर येथील कवठा व पातूर येथील तुलंगा खुर्द या ग्रामपंचायतील मागसवर्ग प्रवर्गातील रिक्त पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.  

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : शुक्रवार दि. 24 जून 2022 रोजी ज्या ठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथ सोडतीकरीता विशेष ग्रामसभेची सूचना देणे. मंगळवार दि. 28 जून रोजी विशेष ग्रामसभेमध्ये आवश्यकतेनुसार सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी सोडत. गुरुवार दि. 30 जून रोजी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी  सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करुन त्याबाबत योग्य ती सूचना व प्रसिद्धी देणे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ