मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश


अकोला, ता.१३(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चालविले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु झाले आहे. शालेय विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील तसेच अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ताः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय  मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान वस्ती, अकोला.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना