मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश

 अकोला, ता.२१(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चालविले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु झाले आहे. शालेय विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  इयता ११ वी व आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही जागा उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील तसेच अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश गुणवत्ता व आरक्षणानिहाय दिला जायो. प्रवेश अर्जांचे वाटप सुरु झाले असून  प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल एस.एस. लव्हाळे यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ताः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय  मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान वस्ती, अकोला.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ