कोविडःआरटीपीसीआर ‘सात’ पॉझिटीव्ह
अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे
(आरटीपीसीआर) 200 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. सात व खाजगी शून्य) सात
+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 07.
आरटीपीसीआर ‘सात’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व सहा महिलांचा समावेश
आहे. पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे-
बार्शीटाकळी-एक, अकोला ग्रामीण- तीन, महानगरपालिका
क्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे,
अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सक्रिय रुग्ण ‘11’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65192(49180+15038+974)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा