मधकेंद्र योजना; इच्छुकांकडून अर्ज मागविले

 अकोला,दि.30 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती व संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेची वैशिष्टे – मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/ छद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवध्रनाची जनजागृती.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- (1) वैयक्तिक मधपाळ-10 मधपेट्या पात्रता – अर्जदार साक्षर असावा, स्वत-ची  शेती असल्यास प्राधान्य, वय  18 वर्षापेक्षा जास्त. (2) केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ – व्यक्ति पात्रता- किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त, असा व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही  व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. (3) केंद्रचालक संस्था- पात्रता- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली  किमान 1000चौ. फुट  सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण, देण्याची क्षमता असलेले सेवा असावीत. (4)केंद्रचालकास 50 मधपेट्या रू 4200/- प्रमाणे 50 अक्के अनुदानावर घेण्यासाठी 50 टक्के रक्कम या कार्यालयास प्रथम जमा करणे अनिवार्य आहे. क) अटी व शर्ती- लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र  लिहुन देणे अनिवार्य राहील व मंडळामार्फत प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य. ड) अधिक माहितीसाठी संपर्क (1) जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन.टी. लवाळे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ , अकोला मो. न. 8432989123, 8698057013 महसुल कॉलनी, शासकीय आय. टी. आय. अकोला दुरध्वनी क्र. 0724-2414250 संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ शासकीय बंगला न. 5, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806, दुरध्वनी – 02168-260264. इच्छुक संस्था, व्यक्तिंनी आपले अर्ज व प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ