वसतीगृहातील महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर


अकोला,दि.23(जिमाका)- महिला व बालविकास विभाग व  जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाच्या वतीने  शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्यादय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, जागृती जागृती शासकीय महिला राज्यगृह संस्थेतील प्रवेशीतांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवारी (दि.21) रोजी पार पडले. या शिबीरात आरोग्य तपासणी, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छते विषयी महिलांना मार्गदर्शन केले. या आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर, शासकीय बालगृहाचे अधिक्षक जयश्री वाढे, सुर्यादय बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज खंडाळकर, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाळे, जागृती शासकीय महिला राज्यगृहाचे सुरेश चोमडे यांनी परिश्रम घेतले.

0000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना