ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; मतदार यादी कार्यक्रम घोषित
अकोला दि.3(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार जानेवारी 21 ते एप्रिल 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच मे 22 ते सप्टेंबर 2022 या
कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत व आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दि.29
नोव्हेंबर 2019 रोजी दिलेला कार्यक्रम योग्य पद्धतीने न राबविल्यामुळे सर्व
निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या
मतदार यादीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. मतदार
यादी कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी मंगळवार दि. 14
जून रोजी, आक्षेप व हरकती दाखल मंगळवार दि. 14 ते 17 जूनपर्यंत तर प्रभागनिहाय
अंतिम मतदार यादी बुधवार दि. 22 जून रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी
निमा अरोरा यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा