कोविडःआरटीपीसीआर ‘दोन’ पॉझिटीव्ह
अकोला दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 185 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी शून्य) दोन + रॅपिड ॲन्टीजेन
चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 02.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व एक महिला रुग्णाचा समावेश असून ते मुर्तिजापूर व शिवणी ता.जि.अकोला येथील रहिवासी
आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सक्रिय रुग्ण ‘13’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65194(49182+15038+974)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 13 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा