तृतीयपंथी व्यक्तिंना मिळणार ओळखपत्र व प्रमाणपत्र; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे गुरुवारी (दि.9) विशेष शिबिर

 

अकोला, दि.6 (जिमाका)- समाजकल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी, तृतीयपंथी व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे गुरुवार दि.9 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वितरण केले जाणार आहे. अकोला येथे दि.9 रोजी दुपारी 12 वा. लोकशाही सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरास तृतीयपंथी व्यक्तिंनी उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ