जि.प.पोटनिवडणूक; दि. 4,5 व 6 जून रोजी मद्यविक्री बंद


अकोला, दि.3 (जिमाका)- बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदमधील हातरुण रिक्त पदाची पोटनिवडणुक होत आहेत. त्यानुसार दि. 5 जून रोजी हातरुण येथे मतदान व दि. 6 जून रोजी  शासकीय धान्य गोदाम बाळापूर येथे मतमोजणी प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  मतदानाच्या एक दिवस आधी (दि.4), मतदानाच्या दिवशी (दि.5) व मतमोजणीच्या दिवशी (दि.6) रोजी मतदान व मतमोजणी क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन