अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

 अकोला,दि.28(जिमाका)- जिल्ह्यात अकोला व बाळापूर तालुक्यात काल (दि.27) रात्री झालेल्या पावसामुळे  घरे, रस्ते, पुलाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे,असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात प्रामुख्याने कंचनपूर, बादलापूर, मांजरी, मोरगाव भाकरे, खंडाळा या गावांमध्ये नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. आज सकाळी साडेआठ वा. संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात 66.3 मि. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यातही व्याळा (99 मि.मी), पारस (83 मि. मी.),  बाळापूर (83 मि.मी.) या मंडळात अधिक वृष्टी झाली.

झालेल्या नुकसानीची माहिती याप्रमाणे- अकोला तालुक्यात 10 घरांची अंशतः पडझड झाल्याची माहिती आहे. तर अकोला तालुक्यात 850 हे.आर तर बाळापूर तालुक्यात 415 हे.आर. अशा एकूण 1265 हे.आर. क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून मांजरी गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. तर हातरुन- कंचनपूर या रस्त्याचेही पावसामुळे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ