जिल्हास्तरीय केबल दुरचित्रवाणी वाहिनी व एफ.एम.रेडीओ संनियंत्रण समितीची बैठक :केबल प्रसारणासंदर्भात तक्रार निवारण कक्ष स्थापन करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 



अकोला,दि.30(जिमाका)- जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील केबल टिव्ही, तसेच केबल ऑपरेटर्स यांच्याद्वारे प्रसारीत केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रेक्षकांच्या तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हास्तरीय केबल दुरचित्रवाणी वाहिनी व एफ.एम. रेडिओ संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस  जिल्हाधिकारी निमा अरोरा उपस्थित होत्या. तसेच  श्रीमती. मेघना पाचपोर,डॉ. आनंद काळे, गणेश सोनोने, अतुल मुळतकर, सदस्य सचिव डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.

खाजगी दुरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्कद्वारे तसेच एफ. एम. रेडिओद्वारे प्रसारीत होणारे कार्यक्रम हे प्रसारण व जाहिरात संहितेनुसार प्रसारीत होतात किंवा नाही याचे संनियंत्रण समितीला करावयाचे आहे. त्यासाठी सदस्यांना केंद्र सरकारच्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क ॲक्ट 1995 आणि केबल टेलीव्हिजन नेटवर्क ॲक्ट 2021 (सुधारीत) याबाबत  माहिती दिली. सोशल मिडियावरुन होणाऱ्या प्रसारणावर अधिक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सदस्यांनी  सांगितले. याबाबत सोशल मिडियावरुन होणाऱ्या प्रसारणावर पोलीस दलाने अधिक काटेकोर लक्ष ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले. तसेच जिल्हास्तरीय तक्रारनिवारण कक्ष स्थापन करावा,असेही निर्देश दिले.

केबल वाहिन्यांवरील प्रसारणाबाबत आपल्या तक्रारीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक   0724-24444 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ