कोविडःआरटीपीसीआर ‘दोन’ पॉझिटीव्ह


अकोला दि.8(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 139 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी शून्य) दोन  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 02.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते रेल ता.अकोट व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘दोन’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65183(49171+15038+974)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ