अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; सुंगधी तंबाखु विक्री प्रकरणी व्यापाऱ्यास अटक

 

अकोला,दि. 7(जिमाका)- अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे जनता भाजी बाजार येथील दुकान नं. 9 बी   येथे सुंगधी तंबाखु  विक्री होत असल्याचे माहिती मिळाली. या आधारावर अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे  यांनी दुकानाची तपासणी करून अन्न पदार्थ सुंगधी तंबाखु (वाणी प्रिमियम) व सुंगधी तंबाखु (बब्बु गोल्ड) या अन्न पदार्थाचा एकुण 18 हजार 700 रुपयाचा साठा विक्रीकरिता साठवलेला आढळला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांनी साठा जप्त करुन दुकान मालकास ताब्यात घेतले. 

            आरोपी रमेश कन्हैयालाल गुरनाई यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदाचे कलमासह भा.द.वि.चे कलम 328, 188, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करुन  सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ही  कारवाई सहआयुक्त अमरावती शरद कोलते व सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांनी केली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ