सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम हक्क संरक्षण व कल्याणासाठी तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप





अकोला, ता.९(जिमाका)- सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.  

लोकशाही सभागृहात आयोजीत या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, स्वयंरोजगार अधिकारी निशिकांत पोफळी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. राठोड यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे तृतीयपंथीय व्यक्तिंच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती सांगितली. तसेच यामागील शासनाची भुमिका विषद केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते तृतीयपंथी व्यक्तिंना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल तृतीयपंथीयांनी शासनाचे आभार व्यक्त करीत तृतीयपंथीय व्यक्तिंच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या ओळखपत्र व प्रमाणपत्राचा उपयोग होईल,असा विश्वास व्यक्त केला. तसेच राहण्याची जागा, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा व अंत्यविधीसाठी जागा उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर श्री सत्यसाई सेवा सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाच्यावतीने तृतीय पंथी व्यक्तिंचे हक्क, त्याबाबतच्या कायदेशीर तरतूदी व कल्याणाच्या योजनांची माहिती दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ