जि.प. पोटनिवडणूक; हातरुण मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर


अकोला, दि.3(जिमाका)-  जिल्हा परिषदमधील 35- हातरुण पोट निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार मतदान रविवार दि. 5 जून रोजी होत आहे. या ठिकाणी कामगार मतदारांना मतदान करता यावे, यासाठी  हातरुण मतदान क्षेत्रात रविवारी दि. 5 जून रोजी स्थानिक सुट्टी किंवा दोन तासाची सवलत देण्याबाबतचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हा परिषदमधील हातरुण निवडणूक विभागाचे क्षेत्रातील कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करता यावे मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी रविवार दि. 5 जून रोजी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत सर्व खाजगी संस्था, व्यापारी संस्था, दुकाने व कारखानदार आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या अधिकारी, कर्मचारी मजुर, कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे याकरीता कामाच्या तासामधुन दोन तासांची सवलत देण्‍यात यावी, असे आवाहन करण्‍यात येते आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना