आंतरराष्ट्रीय योग दिन; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दि.21 रोजी मुख्य कार्यक्रम


अकोला, दि. 15(जिमाका)- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केला आहे. केंद्र शासन  महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात विविध योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा विभागामार्फत अकोला जिल्हात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.   याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेअध्यक्षतेखाली  जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, योगासन सांस्कृतिक मंडळ, अजिंक्य फिटनेस पार्क, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रम्हकुमारी, भारत स्वाभीमान संघ अकोला  विविध योग संस्था यांच्या उपस्थितीत  मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 7 ते 8  यावेळात दिक्षांत समारोह हॉल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे. तरी नागरीकांनी योग कार्यक्रमात सकाळी साडेसहा वाजता सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ