आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात











 अकोला,दि.21(जिमाका)- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी उपस्थित राहून यावेळी स्वतः योगाभ्यासाचे धडे गिरविले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र, पतंजली युवा भारत, योग समिती, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रह्मकुमारी, भारत स्वाभिमान संघ, आर्ट ऑफ लिव्हिंग,  अजिंक्य फिटनेस तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या.

कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक महेशसिंह शेखावत,  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, राजयोगिनी रुक्मिणी दिदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. सुहास काटे यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी योगाभ्यास केला. तसेच ध्यान अभ्यासही करण्यात आला. यावेळी असंख्य योगप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय कोकाटे आभारप्रदर्शन धनंजय भगत यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ