जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक: अपघातप्रवण स्थळांवर सुचना फलक लावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 



          अकोला,दि.7(जिमाका)- जिल्ह्यातील विविध मार्गांवरील अपघातप्रवण स्थळे निश्चित करुन त्यावर मार्गदर्शक सुचनांचे व जागृती करणारे फलक लावावे जेणेकरुन अपघातांची शक्यता कमी करता येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे,  महापालिकेचे अजय शर्मा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षय पांडे, तसेच वाहतुक पोलीस व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील विविध चौकात सिग्नल लावण्यात आले आहेत, तथापि, अतिक्रमणे व होर्डिंग्ज यामुळे सिग्नल दृष्टीपथात येणे व थांबण्यासाठी पुरेशी जागा नसणे ही समस्या येत आहे. यासमस्येवर उपाय म्हणून प्रत्येक सिग्नल चौक हे मोकळे करावे, असे निर्देश देण्यात आले. ऑटो रिक्षांवर शहरी व ग्रामिण भागासाठी हिरवे व लाल रंगाचे स्टिकर्स लावण्याची मोहिम लवकरात लवकर पूर्ण करुन शहरात येणाऱ्या ऑटोरिक्षांच्या प्रमाणावर नियंत्रण आणावे. जिल्ह्यातील रस्त्यांवर वेगमर्यादा पालन होण्यासाठी आवश्यकतेनुसार रस्त्यांवर खुणा कराव्या. वेगमर्यादा फलक लावावे. अशी ठिकाणे निश्चित करुन आवश्यक कारवाई पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले. यासंदर्भात दि.8 जुलै रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत अहवाल सादर करावा,असेही त्यांनी स्पष्ट केले. रस्ते सुरक्षा प्रतिज्ञेचे विमोचनह जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ