कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

  अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 155 अहवाल प्राप्त झाले. त्यात आठ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. आठ व खाजगी शुन्य) 08+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 08.

आरटीपीसीआर ‘आठ

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या सर्व महिला रुग्ण असून. हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘33

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65285(49259+15039+987)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 33 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील सात जण रुग्णालयात दाखल तर अन्य 26 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना