गोरेगाव खु. येथे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

 अकोला दि.26(जिमाका)-  सामाजिक न्याय विभागाद्वारे संचालित अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव खुर्द येथे आज दहावीतील गुणवंत विद्यार्थीनींना गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  याच वेळेस शैक्षणिक सत्र 2022 - 23 मध्ये येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत सम‍ितीचे गटव‍िकास अध‍िकारी एल. बी. बारगिरे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी खिंडकर, गणेश बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एल. बी. बारगिरे यांनी गुणवंत विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी.एम. खुबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन आम्रपाली घनबहादुर यांनी केले. सहाय्यक शिक्षक ए.पी. कचवे, आर.जी. अहिर, पी .एस. वानखडे, सहाय्यक ग्रंथपाल एस.व्ही. पखाण, प्रयोगशाळा सहाय्यक एन. एच. उपवंशी व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ