गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे प्रवेश अर्ज वाटप सुरू

 अकोला,दि.29 (जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यामध्ये मागासवर्गीय मुलामुलीसाठी शासकीय वसतीगृह चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक आर्थिक उन्नती, तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे, तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अकोला या वसतीगृहात इयत्ता 11 वी व आय टी आय साठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध असून प्रवेश अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची मुदत दि.30 जुलै आहे. गुणवत्ता व आरक्षण निहाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अकोल्याचा रहिवासी नसलेल्या परंतु अकोला म. न. पा. हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेवू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल एस. एस. लव्हाळे, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदीराजवळ, हनुमान बस्ती, अकोला यांनी केले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ