कॅम्पस मुलाखतीत आय.टी.आय.च्या १४ प्रशिक्षणार्थ्यांची निवड


अकोला दि.8(जिमाका)-  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र (BTRI) यांच्या वतीने आयोजीत कॅम्पस मुलाखतीत 14 प्रशिक्षणार्थ्यांची पुणे येथील कंपनीत निवड करण्यात आली. पुण्यातील आयएफबी या होम अॅप्लायन्सेस कंपनीच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडीशनींग टेक्नीशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक,प्लास्टीक प्रोसेसींग ऑपरेटर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी भाग घेतला. लेखी परीक्षा आणि मुलाखत या स्वरूपात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भरती प्रक्रीयेत नंतर 14 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली. अशी माहिती प्राचार्य पी. एन. जयस्वाल यांनी दिली आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी उपप्राचार्य एस. आर. ठोकरे ,सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. बी. घोंगडे तसेच संस्थेतील कर्मचारी व व्यवसाय निदेशकांनी परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ