औद्योगिक प्रशिक्षण संस्था; सोमवारी(दि.13) रोजगार भरती मेळावा


अकोला, दि. 9(जिमाका)-  औद्यागिक प्रशिक्षण संस्था, अकोला व मे.बडवे इंजिनियरींग औरंगाबाद  यांच्या सयुक्त  विद्यमाने विविध पदाकरीता रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी सोमवार दि. 13 जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण व अनुषंगिक सूचना केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे.

प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजन करण्याचे आवाहन पंतप्रधान यांनी केले होते. त्यानुसार संधाता, शिट मेटल वर्कर, जोडारी, पेंटर,पीपीओ या व्यवसायातील आय.टी.आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संबधित कंपनीमार्फत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://dgt.gov.in/appmela2022/ या वेबसाईटवर जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करुन उपस्थिती नोंदवावी. तसेच अधिक माहितीकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ