सामाजिक न्याय दिन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

अकोला,दि.24(जिमाका)-राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस दि. 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम रविवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री.आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय येथील ऑडीटोरीयम हॉल, अकोला येथे होणार असून कार्यक्रमाचे शुभारंभ जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री तथा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रम याप्रमाणे : रविवार दि. 26 जून, 2022 रोजी सकाळी 8:30 वाजता महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांचे समता दिंडीस मान्यवरांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. समता दिंडीचा मार्ग: जिल्हाधिकारी कार्यालय परिसर-सर्वोपचार रुग्णालय मार्ग-अशोक वाटिका-नवीन बस स्थानक-प्रमिलाताई ओक हॉल मार्ग-पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे विसर्जन होईल. तसेच सामाजिक न्याय दिनाचे मुख्य कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध पुरस्कार वितरण तसेच या विभागाचे अधिनस्त विविध महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान व कर्ज वाटप करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, खासदार संजय धोत्रे उपस्थित राहणार आहे. तर विशेष निमंत्रित विधान परिषद आमदार डॉ.रणजित पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा, विधानसभा आमदार  प्रकाश भारसाकळे, आमदार हरीष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख,  जिल्हा परिषद समाजकल्याणचे सभापती आकाश सिरसाट यांची उपस्थिती राहणार आहे.  तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा,  मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, समाज कल्याण विभाग अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विजय साळवे आदि उपस्थिती राहणार आहे.

 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ