पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा
अकोला,दि.5(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि. 6 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि. 6 रोजी दुपारी साडेबारा
वाजता पालकमंत्री यांचे संकल्पनेतून आयोजित भव्य महिला आरोग्य रोग निदान शिबिर कार्यक्रमास
उपस्थित.स्थळ-जिल्हा स्त्री रुग्णालय,अकोला, त्यानंतर नियोजन भवन, छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी परिसर, अकोला येथे विविध विषयावर आढावा बैठकीस उपस्थिती:
ते याप्रमाणे - दुपारी एक वाजता जिल्हा नियोजन
कार्यकारी समिती सभा, दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समिती सभा, दुपारी चार वाजता
अकोला विमानतळाबाबत संबधित अधिकारी यांचेसमवेत सभा व राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा
झाडे लावणेबाबत आढावा सभा. दुपारी साडेचार वाजता अटल भुजल योजना आढावा सभा. दुपारी
4 वा.40 मि.नी श्री संत गजानन महाराज विहिर संस्थान, अकोला जहाँ. ता.अकोट येथील रखडलेल्या
विकासकामांबाबत आढावा सभा. सायंकाळी 5 वा. 10 मि.नी आमदार नितीन देशमुख यांचा भाचा स्व.आकाश देशमुख
यांचे परिवारास सांत्वनपर भेट.स्थळ- वऱ्हाड सिटी स्कॅन सेंटर, विद्याविहार गर्ल्स
होस्टेलजवळ, शास्त्री नगर, अकोला. त्यानंतर सायंकाळी 5 वा. 35 मि.नी शेगाव जि. बुलढाणाकडे
प्रयाण करतील.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा